महाराष्ट्र नोकरी अपडेट्स – पोलीस, रेल्वे, बँकिंग, संरक्षण, शिक्षक व इतर शासकीय/खासगी भरतीची माहिती. रोजचे निकाल अपडेट्स, प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी व अभ्यास साहित्य उपलब्ध. तुमच्या स्वप्नातील नोकरीसाठी आजच तयारी सुरू करा.
📢 SSB Bharti 2026: अर्जाची मुदत वाढली – आता 04 मे 2026 पर्यंत संधी!
SSB Bharti 2026: सशस्त्र सीमा बल भरती 2026 – 367 जागांसाठी मोठी संधी
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! सशस्त्र सीमा बल (SSB) मार्फत 2026 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 367 पदांसाठी ही भरती होणार असून विविध तांत्रिक व वैद्यकीय पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
📌 भरतीचा आढावा
एकूण जागा: 367
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत: ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख:अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 202604 मे 2026
📋 पदांचा तपशील
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)
02
2
हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)
197
3
हेड कॉन्स्टेबल
(इलेक्ट्रिशियन)
29
4
हेड कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)
05
5
हेड कॉन्स्टेबल (लॅबोरेटरी
असिस्टंट)
30
6
हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी
असिस्टंट)
12
7
कॉन्स्टेबल (नर्सिंग असिस्टंट
कम मेडिक)
34
8
असिस्टंट सब इन्स्पेक्टर
(रेडिओग्राफर)
03
9
असिस्टंट सब इन्स्पेक्टर
(फार्मासिस्ट)
02
10
असिस्टंट सब इन्स्पेक्टर
(ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)
01
11
असिस्टंट सब इन्स्पेक्टर
(डेंटल टेक्निशियन)
01
12
सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स)
10
13
सब इन्स्पेक्टर (पायोनियर)
21
14
सब इन्स्पेक्टर (कम्युनिकेशन)
20
Total
367
🎓 शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग आणि किचन
मॅनेजमेंट’ (Catering and Kitchen Management) डिप्लोमा (ii) केंद्र सरकार
किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ‘कॅटरिंग आणि किचन
मॅनेजमेंट’ (Catering and Kitchen Management) मधील किमान दोन वर्षांचा
डिप्लोमा. (iii) किमान 100 बेडच्या रुग्णालयात किंवा केंद्र/राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेत ‘स्टुअर्ड’ (Steward) म्हणून काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव.
पद क्र.2: (i) 12वी (PCM) उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/Computer Science/IT)
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा
पद क्र.4: (i) 12वी (Biology) उत्तीर्ण (ii)
‘पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास’ (Veterinary and Livestock Development),
‘पशुवैद्यकीय सहाय्यक’ (Veterinary Stock Assistant) किंवा ‘पशुसंवर्धन’
(Animal Husbandry) यांपैकी कोणत्याही विषयातील डिप्लोमा
पद क्र.5: (i) 12वी (Biology) उत्तीर्ण (ii)
प्रयोगशाळा सहाय्यक’ (Laboratory Assistant) कोर्स (iii) केंद्र सरकार
किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळा निदान केंद्र
(Laboratory Diagnostic Centre), रुग्णालय किंवा संस्थेच्या प्रयोगशाळेत
‘प्रयोगशाळा सहाय्यक’ म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मान्यताप्राप्त संस्थेकडून ‘फिजिओथेरपी’मधील किमान एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, (iii) केंद्र
सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त फिजिओथेरपी केंद्र, किमान
100 बेडचे रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘फिजिओथेरपी सहाय्यक’ म्हणून किमान
एक वर्षाचा अनुभव.
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन’ (St. John’s Ambulance Organization) किंवा
‘रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया’ कडून ‘प्रथमोपचार’ (First Aid) प्रमाणपत्र
अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, (iii) केंद्र सरकार किंवा राज्य
सरकारद्वारे मान्यताप्राप्त, किमान 50 बेडच्या रुग्णालयात किंवा
संस्थेमध्ये ‘परिचर्या सहाय्यक’ (Nursing Assistant) म्हणून किमान एक
वर्षाचा अनुभव.
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ‘मेडिकल इमेजिंग
टेक्नॉलॉजी’ किंवा ‘रेडिओग्राफी’ विषयातील डिप्लोमा (iii) ‘रेडिओलॉजी
इमेजिंग सेंटर’मध्ये, किंवा किमान
100 बेडच्या रुग्णालयात, किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारांनी मान्यता
दिलेल्या संस्थेमध्ये ‘रेडिओग्राफर’ म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव
असावा.
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फार्मसी डिप्लोमा
(iii) किमान 100 बेडच्या रुग्णालयात, किंवा केंद्र सरकार अथवा राज्य
सरकारांनी मान्यता दिलेल्या संस्थेमध्ये ‘फार्मसिस्ट’ म्हणून किमान एक
वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ‘ऑपरेशन थिएटर
टेक्नॉलॉजी’ किंवा ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ डिप्लोमा (iii) किमान 100
बेडच्या रुग्णालयात, किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारांनी मान्यता
दिलेल्या संस्थेमध्ये ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान एक वर्षाचा
कामाचा अनुभव असावा.
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल हायजिनिस्ट
डिप्लोमा (iii) दंत रुग्णालयाच्या ‘डेंटल युनिट’मध्ये, किंवा किमान 100
खाटांच्या रुग्णालयात, किंवा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारांनी मान्यता
दिलेल्या संस्थेमध्ये किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.
पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM डिप्लोमा
पद क्र.13: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.14: B.E (Electronics and Communication/Computer Science/ Information Technology) किंवा B.Sc (Physics, Chemistry and Mathematics)
🎯 वयोमर्यादा
19 एप्रिल 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]